फ्लॅट खरेदीच्या फसवणूक प्रकरणी आरोपींना न्यायालयीन कोठडी

मार्च 29, 2022 10:48 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२२ । शेत जमीन व फ्लॅट खरेदी व्यवहारात प्रा.आर एस निकुंभ यांची फसवणूक झाल्याप्रकरणी आरोपी आनंदा चौधरी, व राजेंद्र धनगर, उमेश पाटील या तिघांना सोमवारी एरंडोल न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी विशाल धोंडगे यांनी तिघा आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. तिघा आरोपींतर्फे जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आले त्यावर बुधवारी सुनावणी होणार आहे.

court order jpg webp

आनंदा चौधरी यांच्यातर्फे ऍड. महेंद्र चौधरी व ऍड. राहुल पारेख यांनी कामकाज पाहिले. धनगर यांच्यातर्फे ऍड.एम.बी.पाटील यांनी कामकाज पाहिले, उमेश पाटील यांच्यातर्फे ऍड.अरुण देशमुख यांनी कामकाज पाहिले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now