शिरसाड येथे अल्पवयीन बालिकेवर अतिप्रसंग,आरोपीला केली अटक
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२१ । शिरसाड ( ता. यावल ) येथील १२ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर एका तरुणाकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न झाला. ही घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. सखाराम ऊर्फ अक्रम मालसिंग भिलाला (वय २५,) असे संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले.
सविस्तर असे की, शिरसाड येथील पीडित १२ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार ते मोहनपुरा ( जि.बडवाणी, मध्य प्रदेश ) येथील रहिवासी आहेत. शिरसाड येथे हातमजुरी करून उदरनिर्वाह चालवतात. शनिवारी दुपारी फिर्यादीची १२ वर्षीय लहान बहिण गावालगत कपाशीच्या शेतात सरपण जमा करत होती. यावेळी पूर्वी शिरसाड येथे राहणारा सखाराम ऊर्फ अक्रम मालसिंग भिलाला (वय २५, ह. मु. वराडसीम ता.भुसावळ ) हा तेथे आला. त्याने अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला.
यावेळी मुलीचा आवाज ऐकून काही ग्रामस्थ व फिर्यादी तेथे पोहोचले. हे पाहून सखारामने तेथून पळ काढला. मात्र, ग्रामस्थांनी पाठलाग करून त्यास पकडले व पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करत आहेत.