---Advertisement---
गुन्हे चाळीसगाव

दुर्दैवी! पत्नीच्या डोळ्यादेखत पतीचा अपघाती मृत्यू

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२३ । रुग्णालयातील काम आटोपून घराकडे निघालेल्या तरुणाचा डंपरच्या खाली आल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. संदीप राजेंद्र सूर्यवंशी (33, मराठे) असे मयत तरुणाचे नाव असून या अपघात पत्नी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला.

sandip suryawanshi jpg webp

नेमकी काय आहे घटना?
चाळीसगाव तालुक्यातील खडकी येथे राहणारा संदीप राजेंद्र सूर्यवंशी हा शुक्रवार, 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास पत्नी गायत्रीसोबत येथून दुचाकी (एम.एच.19 डी.क्यू.1859) ने जामनेर येथे आला होता. जामनेर येथील रुग्णालयातील काम आटोपून तो पत्नीसह दुचाकीने पाचोर्‍याकडे येत असतानाच सांगवी गावाजवळील बस स्थानकाजवळ संदीपची दुचाकी गतिरोधकावर आदळली व नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरल्याने पत्नी गायत्री ही विरुध्द बाजुला पडली

---Advertisement---

मात्र संदीप रस्त्यावर पडला व त्याचवेळी कुर्‍हाडच्या दिशेने धरधाव डंपर (एम.एच.46 एफ. 7824) गेल्याने वाहनाच्या मागील चाकाखाली सापडल्याने संदीपचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला असून घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला. तपास पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल अरविंद मोरे व शैलेंद्र चव्हाण हे करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---