---Advertisement---
गुन्हे पारोळा

Accident : ट्रकचा दुचाकीला धडक; अपघातात वाघऱ्याच्या प्राैढाचा मृत्यू

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२२ । पाराेळा तालुक्यातील तुराटखेडा गावाजवळ महामार्गावरील पुलावर ट्रकने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत नातेवाइकाचा अंत्यविधी अाटाेपून घरी जाणाऱ्या वाघरे येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पाराेळा पाेलिसांत गुन्हा नाेंदवण्यात आला आहे.

sccident jpg webp

वाघरे येथील आबा चत्रू हाटकर (वय ४०) हे त्यांच्या समाजातील व्यक्तीचा मृत्यू झाल्याने अंत्यविधीसाठी दुचाकीने एरंडाेल तालुक्यातील पिंपळकाेठा येथे गेले हाेते. अंत्यविधी आटाेपल्यानंतर अाबा हाटकर हे दुचाकीने परत येत हाेते. तुराटखेडा गावाजवळीला पुलावर त्यांच्या दुचाकीला ट्रकने जबर धडक दिली. दरम्यान, आबा हाटकर यांना तत्काळ रुग्णवाहिका चालक ईश्वर ठाकूर यांनी पाराेळा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डाॅ. धनंजय पाटील यांनी तपासून हाटकर यांचा मृत घाेषीत केले. या प्रकरणी पाराेळा पाेलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवण्यात आला आहे. दरम्यान, घटनास्थळी वाघरे येथील नागरिकांनी माेठी गर्दी केली हाेती. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---