Accident : भरधाव ट्रॅक्टरची स्कूटीला धडक, महिला ठार, एक जखमी
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२२ । वरणगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती बोदवड दुय्यम उपबाजार समिती वरणगाव समोरील जून्या महा मार्गावर भरधाव ट्रॅक्टरने स्कूटीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक महिला ठार तर मुलगा किरकोळ जखमी झाझा. ही घटना गुरुवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. ट्रॅक्टरचालका विरूध्द वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरणगाव येथील दुय्यम उपबाजार समितीच्या आवारात चाटे इग्रंजी माध्यमाच्या शाळेत इ.४थीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या चिमूकल्याला घेऊन घराकडे जाण्याकरीता महामार्ग ओंलाडण्याच्या तयारीत असतांना अचानक वरणगावकडून मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या दिशेन राखेने भरलेल ट्रॅक्टर क्रंमाक एमएच ३४ एल ७११३ चालक नाव गाव माहित नाही .याने स्कुटी क्रंमाक एम एच १९ बी झेड १०५७ या वाहनाला जोरदार धडक दिली या धडक मधे मागे बसलेला चिमुकला फेकला गेल्याने जखमी झाला आहे . मात्र त्याची आई ममता राजेंद्र जूबंळे ( धनगर ) वय ३५ राहणार जगदंबा नगर वरणगाव या मागील ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला . फिर्यादी रविंद्र गोविदा धनगर वय ५२ राहणार विकास कॉलणी यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसात ट्रॅक्टरचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तपास वरणगाव पोलिस स्टेशनचे सपोनि आशिष आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय परशुराम दळवी करीत आहे . मयत ममता हिचे शेवच्छेदन वरणगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैदयकीय अधिक्षक क्षितीजा हेंडवे यांनी केले . मयताच्या पश्चात पती , एक मुलगा , एक मुलगी असा परिवार आहे . वरणगाव नगर परिषद पाणीपुरठा विभागाचे कर्मचारी राजेंद्र ( भूरा ) जुंबळे यांच्या पत्नी होत .
वरणगाव परीसरात विटभट्टयांचे प्रमाण अधिक आहे त्याकरीता दिपनगर औषणीक विद्युत केंद्रातील जळालेली राख विल्हाळे बंडात सोडलेल्या राखेचा वापर केला जात असल्याने शहरातून मोठया प्रमाणात डंपर व ट्रक्टरच्या माध्यमातून राख विटभटयांवर आणली जाते. यामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. त्याच प्रमाणे सदरची घटना कारणीभूत ठरली असुन चालक मात्र फरार होण्यास यशस्वी झाला आहे .