---Advertisement---
गुन्हे पारोळा

Accident : मुलीच्या लग्नाचा किराणा घेण्यासाठी जाणाऱ्या पित्यावर काळाचा घाला

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२२ । घरात एखादा कार्यक्रम असल्याच्या आनंदाने घरातील सर्व सदस्यांचे चेहरे फुलतात. मात्र, एखाद्या कुटुंबावर त्या कार्यक्रमाचे काही दिवस असताना दुःखाचा डोंगर कोसळतो. पारोळा येथील ७३ वर्षीय वृद्ध मुलीचे लग्न असल्याने किराणाघेण्यासाठी जात असताना अपघात होऊन मृत झाल्याची घटना घडली आहे.

accident 18 jpg webp

भैय्या सतीश रोकडे यांनी फिर्यादीनुसार त्यांचे चुलत भाऊ अरुण साहेबराव पाटील यांच्या मुलीचे लग्न आहे. त्यानिमित्त किराणा घेण्यासाठी ते २३ रोजी दुपारी २ वाजता आपल्या दुचाकीने (क्र.एम.एच.१९-डी.एक्स.०४७८) पारोळा येथे निघाले होते. कडजी गावाजवळ त्यांच्या दुचाकीला, राजस्थानकडून येणाऱ्या टँकरने (क्र.एम.एच.४३-पी.८५७८) मागून जोरदार धडक दिली. यात दुचाकीचा चुराडा होऊन अरुण पाटील हे जागीच ठार झाले. घरात काही दिवसांवर लग्न कार्य असताना ही दु:खद घटना घडल्याने कडजी गावात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातप्रकरणी टँकर चालक राहुल झा याला अटक केली आहे.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---