---Advertisement---
गुन्हे धरणगाव

Accident : भरधाव खाजगी बसच्या धडकेत पादचारी जागीच ठार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२२ । भरधाव वेगातील खाजगी बसच्या धडकेने पादचारी जागीच ठार झाल्याची घटना धरणगाव-चोपडा रस्त्यावर सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

accident 34 jpg webp

धरणगाव ते चोपडा रोडवरील रोटवद ते साळवा फाटा रोडवर सोमवार, 24 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास बाळू पांडूरंग साळुखे (34) हे साळवा फाट्याकडे पायी येत असतांना चोपड्याकडे जाणार्‍या भरधाव खाजगी बस (क्र. एम.एच.46.जे.0765) वरील चालक एकनाथ पंडित सैदाणे (रा.चोपडा) याने ओव्हरटेक करीत असतांना साळुखे यांना जबर धडक देत गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात संशयित आरोपी एकनाथ सैंदाणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा.फौजदार सैय्यद करीम करीत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---