जळगाव शहर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जनसंपर्क अधिकारी यांचा अपघात
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२१ । शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी विश्वजीत चौधरी यांची दुचाकी घसरून अपघात झाला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी विश्वजीत चौधरी हे शुक्रवारी दुपारी जेवण आटोपून घरून महाविद्यालयात येत होते. मू.जे.महाविद्यालयाजवळ त्यांची दुचाकी घसरल्याने अपघात झाला. चौधरी यांच्या उजव्या हाताला आणि पायाला दुखापत झाली असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.