---Advertisement---
गुन्हे भुसावळ

टायर फुटल्याने मंगेश पाटील यांच्या वाहनाला मांजरसुंबा घाटात अपघात : पाच जण जखमी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२२ । भुसावळाचे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश पाटील यांच्या वाहनाला बीड शहराजवळ अपघात झाल्याने या अपघातात पाटील यांच्यासह कुटुंबातील पाच सदस्य जखमी झाले. वाहनांचे टायर फुटल्याने हा अपघात शुक्रवारी पहाटे दिड वाजेच्या सुमारास घडला. सुदैवाने वेळीच जखमींना बाहेर काढण्यात यश आल्याने जखमींची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.

accident 34 jpg webp

अचानक फुटले टायर
भुसावळातील हुडको कॉलनीतील रहिवासी व भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मंगेश पाटील हे त्यांची पत्नी रोहिणी मंगेश पाटील (24), मुलगा तीर्थराज (4), लहान मुलगा स्वराज (2) तसेच त्यांचे मामा वाय.एल.पाटील (50, रा.उदळी), संगीता पाटील (45, रा.उदळी), आशिष पाटील (23, रा.उदळी) हे गुरूवारी पंढरपूर येथून पांडुरंगाचे दर्शन घेऊन रात्री 7.45 वाजता भुसावळकडे कार (एम.एच.19 सी.झेड.7673) ने येत असताना मांजरसुंबा घाटात रात्री 12.30 वाजेच्या सुमारास गाडीचे पुढच्या बाजूचे क्लिनर साईडचे टायर अचानक फुटल्याने वाहन उलटले. या अपघातात पाटील कुटुंबातील सदस्य जखमी झाले.

---Advertisement---

सिव्हील हॉस्पीटलमधील कर्मचारी झाले देवदूत
महामार्गावर अपघात झाला त्यावेळी पाटील यांच्या गाडीच्या मागून दोन ते तीन कार येत होत्या. पाटील यांच्या गाडीचा अपघात त्याच्या समोरच झाल्याने त्यांनी तात्काळ त्यांच्या गाड्या थांबवून मदतीसाठी धावून गेले. यावेळी त्या दोन ते तीन कारमध्ये बीड सिव्हील हॉस्पीटलमधील कर्मचारी होते. त्यांनी त्यांचा परिचय देत मदत सुरू केली. दरवाजा उघडत नसल्याने त्याच वेळी रस्त्याने जाणारी एक कार थांबली, त्या कारमध्ये कार मॅकेनिकल होता, त्याने तत्काळ दरवाजांचे लॉक उघडून दिल्याने जखमींना बाहेर काढणे सुलभ झाले. मॅकेनिल व हॉस्पीटलमधील कर्मचारी हे देवदूत बनूनच जणू तेथे आले.

जखमींची प्रकृती धोक्याबाहेर
अपघातग्रस्त गाडीतून जखमींना बाहेर काढून सिव्हील हॉस्पीटलमध्ये नोकरीत असलेल्या कर्मचार्‍यांनी त्यांच्याच वाहनातून बीड सिव्हील हॉस्पीटलमध्ये हलवले तर मंगेश पाटील यांना तेथील हायवे पोलिसांनी त्यांच्या गाडीतून सिव्हील हॉस्पीटलला दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा प्रचारक यांनी हॉस्पीटलला धाव घेत पाटील व परीवारातील सदस्यांना धीर दिला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच त्यांचे वडील, मामा, भाऊ हे रात्रीच येथून बीडकडे निघाले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---