जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२१ । जळगाव शहरातील ममुराबाद नाक्याजवळ भरधाव सुमोने धडक दिल्याने एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून एक जखमी झाला आहे. दरम्यान, पळून जात असलेल्या सुमोला ममुराबाद जवळ पकडण्यात आल्याचे समजते.
थोरगव्हाण ता.यावल येथील अमोल संभाजी पाटील यांच्यासह एक जण दुचाकीने जळगावकडे येत होते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास ममुराबादकडे जात असलेल्या भरधाव सुमो वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातात अमोल पाटील हे जागीच ठार झाले असून मंगल पाटील हे जखमी झाला आहे.
दरम्यान, अपघातानंतर सुमो चालकाने घटनास्थळाहुन पळ काढला परंतु ममुराबाद गावाजवळ त्याची चारचाकी बंद पडल्याने त्याला पकडण्यात आले.
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/266853698520558