---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

दुभाजकावर वाहन धडकून अपघात; महिला गंभीर जखमी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज| १ ऑगस्ट २०२३। शहरातील आकाशवाणी चौकातील दुभाजकावर वाहन धडकून झालेल्या अपघातात चालकासह एक महिला जखमी झाली आहे. या अपघातप्रकरणी सोमवार, ३१ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रामानंदनगर पोलीस ठाण्यात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

jalgaon mahanagar palika 10 jpg webp webp

जळगाव शहरातील पिंप्राळा हुडकोत शेख रहिमोद्दीन शेख अलाउद्दीन हे वास्तव्यास आहेत. त्याची पत्नी मुमताज बी शेख ह्या २७ जुलै रोजी ह्या आकाशवाणी चौकातून एका वाहनातून शिवकॉलनीकडे जात होत्या. यादरम्यान वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन आकाशवाणी चौकातील महामार्गावर दुभाजकावर धडकले.

---Advertisement---

या अपघातात चालक शेख ईमरान शेख उस्मान व मुमताज बी शेख रहिमोद्दीन हे दोन्ही जखमी झाले. या अपघातानंतर वाहनचालक शेख ईमरान शेख हा घटनास्थळावरुन पळून गेला. याप्रकरणी जखमी मुमताच यांचे पती शेख रहिमोद्दीन यांनी दिलेल्या तक्ररीवरुन सोमवारी अपघातास कारणीभूत शेख ईमरान शेख उस्मान रा. तांबापुरा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल हे करीत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---