जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२२ । भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात शहरातील स्टेट बँक चौकात घडला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
पाचोरा तालुक्यातील कासमपुरा येथील पवन ईश्वर खरे हे कामानिमित्ताने दि. २५ एप्रिल रोजी त्यांच्या मित्राची दुचाकी घेवून जळगावात आले होते. या दरम्यान स्टेट बँक चौकात चारचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीचे नुकसान झाले तर, पवन खरे यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत होवून पाय फ्रॅक्चर झाला. उपचार घेतल्यानंतर पवन खरे यांनी तब्बल दीड महिन्यानंतर मंगळवार, दि. ७ जून रोजी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन (एमएच १९ सीव्ही ९९३९) वरील क्रमाकांच्या चारचाकीवरील चालकाविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक फिरोज तडवी हे करीत आहेत.