जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२२ । पारोळा तालुक्यातील वंजारी फाट्या जवळ प्रवासी वाहून नेणार्या पॅजो रिक्षेची आईसस्क्रीमच्या रिक्षेला धडक होऊन अपघात झाला. या अपघातात नऊ प्रवासी जखमी झाले. असून यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.
तालुक्यातील वंजारी फाट्याच्या पुढे बालाजी कोटेक्स समोर एका आईस्क्रीमची रिक्षा व प्रवासी वाहतूक करणार्या पॅजो रिक्षाची धडक झाली. या अपघातात नऊ जण जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेऊन जखमींना रूग्णालयात दाखल केले.
जखमी प्रवासी आत्माराम तुकाराम भील (वय ५५), कलाबाई आत्माराम भील (वय ५०), रामसिंग शायसिंग भील (वय ५०),संगीता हिंमत लोणारी (वय ३८, राहणार तुराटखेडा तुर्क), नरेंद्र सुरेश पाटील (वय १८, रत्नापिंप्री), मंगला रामा भील (वय ४५, रा. दबापिंप्री), मच्छिंद्र चंद्रकांत भील (वय ३०, रा. वंजारी), मुजाईद मेहबूब शेख (वय २३, रा. दोंडाईचा), पॅजो रिक्षा चालक मुकेश प्रकाश पवार (पातोंडा), लक्ष्मी हिंमत लोणारी (वय १३), योगिता हिंमत लोणारी (वय १५) हे नऊ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघातामध्ये संगीता लोणारी, कलाबाई भील या या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले आहे. हा अपघात शनिवारी सायंकाळी घडला असून या संदर्भात रात्री उशीरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.