जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२१ । शहरातील काव्यरत्नावली चौकाकडून डी मार्टकडे जाणाऱ्या रस्त्यावर आयसीआयसीआय बँकेसमोर वळण घेत असलेल्या एका दुचाकीला दुसर्या दुसऱ्याने धडक दिल्याची घटना रात्री ९.३० च्या सुमारास घडली. अपघातात दोन्ही दुचाकीवरील १-१ जण जखमी झाले आहे.
शहरातील काव्यरत्नावली चौक ते डी मार्ट हा रस्ता दुचाकीस्वारांसाठी रेसिंग ट्रॅक प्रमाणे झालेला आहे. या रस्त्यावरून रात्रीच्या वेळेस तरुण-तरुणी भरधाव वेगाने दुचाकी घेऊन जात असतात. अनेक वेळा या रस्त्यावर स्टंटबाजी देखील केली जाते. परिसरातील रहिवाशांनी याबाबत अनेक वेळा पोलिसांकडे तक्रारीदेखील केल्या आहेत. शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास आयसीआयसीआय बँकेसमोर दुचाकी क्रमांक एमएच.१९.एजे.६१५१ आणि दुचाकी क्रमांक एमएच.१९.सीएम. ६२३८ यांची वळण घेताना जोरदार धडक झाली. अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झालेले आहे. एका दुचाकीवरील प्रौढ तर दुसऱ्या दुचाकीवरील तरुण-तरुणी जखमी झाले असून घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे.