जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२२ । भरधाव मालवाहू वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी १ वाजेच्या सुमारास एमआयडीसीत घडली. जखमी झालेल्या व्यक्तीला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
दिपक शरद खडके (वय ४१) रा. जुने जळगाव, असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. खडके हे आज रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकी (एमएच १९ एजी ५९३४) ने एमआयडीसीतील ‘के’ सेक्टरमध्ये काम आटोपून घरी परतत असतांना रेमंड चौफुलीतील भारत गॅसकडे जाणाऱ्या रस्त्याने जात असतांना समोरून मालवाहू वाहन (एमएच १९ सीवाय २०९७) ने जोरदार धडक दिली.
या अपघातात दिपक खडके यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या घटनेबाबत एमआयडीसी पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.