यावल
Accident : भालोद येथील ३५ वर्षीय तरुण गंभीर जखमी
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । यावल तालुक्यातील सांगवी बु. जवळ बुधवारी सायंकाळी दुचाकीचा अपघात घडला. त्यात भालोद येथील ३५ वर्षीय तरूण गंभीर जखमी झाला. त्याला जळगावला हलवण्यात आले.
भालोद येथील रहिवासी गुलशेर अरमान तडवी हा तरूण बुधवारी सायंकाळी अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्गावर सांगवी बुद्रूक गावाजवळ गंभीर जखमी अवस्थेत आढळला. गावातील नागरिकांनी त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे डॉ. शुभम तिडके, अधिपरिचारिका नेपाली भोळे, पिंटू बागूल, प्रवीण बारी यांनी प्रथमोपचार केले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली असून पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले. हा तरुण दुचाकी अपघातात जखमी झाल्याचे प्राथमिक चित्र समोर आले.