---Advertisement---
जळगाव जिल्हा

अभाविप देवगिरी प्रदेश कार्यकारिणी जाहीर! जळगावचे वरुणराज नन्नवरेंची प्रदेश सहमंत्रीपदी निवड

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ डिसेंबर २०२३ । अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन ७-१० डिसेंबर दरम्यान नवी दिल्ली येथे गृहमंत्री अमित शाह, ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा,राष्ट्रीय अध्यक्ष डॉ राजशरण शाही,राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल व इतर सामाजिक व राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ मान्यवरच्या उपस्थितीत पार पडले.

varunraje nannavare jpg webp

या अधिवशनासाठी देशभरातून ८००० विद्यार्थी नवी दिल्लीत दाखल झाले होते. अधिवेशनाचा पहिल्या दिवशी देवगिरी प्रदेशाचे प्रदेश अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनात प्रदेशची नूतन कार्यसमिती व कार्यकारणी घोषित करण्यात आली.

---Advertisement---

जळगाव जिल्ह्यातून प्रदेह सहमंत्री म्हणून वरुणराज नन्नवरे,कार्यसमिती सदस्य म्हणून नागेश गलांडे व अजय सपकाळ, विद्यार्थीनी प्रमुख सौ.प्रतिमा याज्ञिक, मेडेव्हिजन संयोजक श्रेया स्वामी व प्रदेश कार्यकारणी सदस्य म्हणून प्रा.राहुल कुलकर्णी, प्रा.अमरदीप पाटील, प्रसाद भापकर,मयूर माळी, चिन्मय महाजन,सागर बारी,रेणुका जाधव, श्रावणी अवरगंड,गौरव पाटील व हर्षल पाटील यांची घोषणा करण्यात आली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---