जळगाव लाईव्ह न्यूज । सध्या सोशल मीडियावर अमिष दाखवून अनेक तरुण तरुणींना आर्थिक किंवा मानसिक जाळ्यात अडकवलं जात असल्याच्या बातम्या अनेक समोर आल्या आहेत. अशीच एक बातमी जळगाव जिल्ह्यातून समोर आलीय. ज्यात इन्टाग्रामवर ओळख झालेल्या एका तरुणाने महिलेला प्रमाच्या जाळ्यात फसवून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. मात्र महिला गरोदर राहताच तरुणाने पळ काढलाआहे. यांनतर पीडित महिलेने पोलिस ठाणं गाठलं अन् तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पिडीत महिलाचा विवाह 2018 मध्ये झाला होता. मात्र, पतीशी पटत नसल्याने महिला मागील दोन वर्षापासून माहेरी अमळनेर तालुक्यातील एका गावात माहेरी राहत होती. महिलेला पती त्रास देत असल्याने महिलेने माहेरी येण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी इन्टाग्रामवर तिला 2021 मध्ये एका तरुणाची फ्रेंड रिक्वेस्ट आली. एकनाथ छबिलाल पवार असं या तरुणाचं नाव होतं. एकनाथशी तरुणाची चांगली मैत्री झाली. हळूहळू तरुणीचं एकनाथवर प्रेम जडलं. एकनाथने महिलेला लग्नाचे आमिष दाखवलं. पीडित महिलेशी खापरखेडा, सोनवद आणि पुणे येथे वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.
लग्नाचं अमिष अन् शरीरसंबंध
मात्र जेव्हा जेव्हा तरुणीने लग्नाचा विषय काढला, तेव्हा तरुणाने लग्नास टाळाटाळ केला. लग्नाचा तगादा लावल्यावर दोघांमध्ये भांडणं झाली. परंतू या काळात महिला गरोदर राहिल्यानंतर एकनाथ घाबरला अन् त्याने पळ काढला. लग्नास टाळाटाळ केल्यानं सदर महिलेने पोलिस ठाणं गाठलं अन् एकनाथविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी एकनाथ छबीलाल पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलीस या प्रकरणात अधिकची माहिती घेत आहेत.