⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | पाचोऱ्याच्या अल्पवयीन मुलीवर सातारा जिल्ह्यात अत्याचार, बाळाला दिला जन्म, गुन्हा दाखल

पाचोऱ्याच्या अल्पवयीन मुलीवर सातारा जिल्ह्यात अत्याचार, बाळाला दिला जन्म, गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी । तालुक्यातील एका गावात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने अत्याचारातून एका मुलाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील एका गावात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. अल्पवयीन मुलीचे आईवडील हे ऊस तोडणीचे काम करतात. यासाठी त्यांना जिल्ह्याबाहेर कामासाठी जावे लागते. पीडीत मुलगी व तिचे आईवडील हे कराड जि. सातारा येथील साखर कारखान्यात लागणाऱ्या ऊस तोडणी साठी सन – २०१९ पासुन वास्तव्यास होते. दरम्यान कुटुंबातील एका १६ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आले. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली व तीने काही दिवसांपुर्वीच मुलाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे.

यासंदर्भात मल्हार पेठ जि. सातारा येथील पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी दिपक शांताराम सोनवणे, कल्पना शांताराम सोनवणे, शांताराम भगवान सोनवणे, शालिक सोनवणे, सिंधु भरत भिल, भरत भिल या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हा गुन्हा शुन्य क्रमांकाने पाचोरा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्याने शनिवारी रात्री कलम 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहूल मोरे करीत आहे.

हेही वाचा :

author avatar
Tushar Bhambare