Jalgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२२ । तालुक्यातील वराड बुद्रुक ग्रामपंचायतीत विकासकामासाठी मंजूर रक्कम काढण्यात आल्यानंतर तसेच बनावट दस्तावेज तयार करुन ते खरे असल्याचे चौकशीत दाखवून 26 लाख 36 हजार 300 रुपयांचा अपहार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील वराड बुद्रुक ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक बबन राजु वाघ आणि सरपंच उखा किसन मोरे यांच्याविरोधात 420, 467, 468, 471, 406, 409, 120(4). 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पद्माकर बुधा अहिरे पंचायत समिती जळगाव येथील ग्रामपंचायत विस्तार अधिकारी पद्माकर बुधा अहिरे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. वेळोवेळी झालेली चौकशी, त्यांचे अहवाल, ग्रामस्थांच्या तक्रारी, माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांचा पाठपुरावा आदींच्या माध्यमातून हा गुन्हा दाखल झाला आहे.