⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | अबब.. केळीचे घड चोरताना एक महिला रंगेहाथ, दोघे पसार

अबब.. केळीचे घड चोरताना एक महिला रंगेहाथ, दोघे पसार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर च्या नायगांव शिवारात केळीचे घड चोरी करताना एका महिलेला शेतकऱ्याने रंगेहाथ पडकले, तर दोघे पसार झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत शेतकऱ्याने मुक्ताईनगर पोलिसांत तक्रार दिली. दरम्यान तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकरी सुभाष बेलदार (वय ४९) यांनी पोलिसांत तक्रार दिली. बेलदार यांचे तालुक्यातील नायगांव शिवारात शेती असून त्यात केली लागवड केली आहे. दि. २६ रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास ते शेतात गेले असता. त्यांच्या शेतीतील केळी बागेतुन तिनजण केळीघड कापुन नेत असताना त्यांच्या निर्दशनास आले. त्यांना हटकले असता यातील एक महिला व एक पुरुष केळीचे घड सोडुन तेथुन लागलीच पसार झाले. मात्र एका महिलेस रंगेहाथ पकडण्यात आले. शेतकऱ्याने महिलेला पोलिसांच्या स्वाधीन केले.

याबाबत पोलीसांनी अधिक चौकशी केली असता, नायगाव येथील भारती राहुल वाघ, लिला भास्कर पोहेकर व राहुल राघो वाघ अशी नावे समोर आली आहे. शेतकरी सुभाष बेलदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या तिघांविरुद्ध मुक्ताईनगर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक उमेश महाजन करीत आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह