---Advertisement---
नोकरी संधी

परीक्षेविना थेट नोकरी…एअरपोर्टवर अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये भरती, 1 लाखांपर्यंत वेतन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२१ । एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण २९ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने  अर्ज दाखल करू शकतात. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया चा वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावेत, असं आवाहन करण्यात आला आहे. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 31 ऑगस्ट अशी निश्चित करण्यात आली आहे.  अर्ज दाखल करण्यास उशीर न करता पात्र उमेदवारांनी अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.

aai bharti

पदांचा तपशील: 
सीनियर असिस्टंट ऑपरेशन्स : 14 जागा
सीनियर असिस्टंट वित्त : 6 जागा
सीनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स : 9 जागा

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता : 

सीनियर असिस्टंट ऑपरेशन साठी अर्ज करणारा उमेदवार हा पदवीधर असावा आणि त्याच्याकडे एलएमव्ही प्रकारातील लायसन्स असावे. त्यासोबतच त्याचा डिप्लोमा इन मॅनेजमेंट हा कोर्स झालेला असणे आवश्यक आहे. तर, सीनियर असिस्टंट वित्त या पदासाठी उमेदवार हा बी.कॉम. असावा. त्याचा संगणकाचा तीन ते सहा महिन्याचा प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण झालेला असणे आवश्यक आहे. सीनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स या पदावर अर्ज करणारा उमेदवार हा डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, रेडिओ इंजिनिअरिंग मधील उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा :

तिन्ही पदांसाठी कमाल वयोमर्यादा 50 निश्चित करण्यात आली आहे.

वेतनश्रेणी : 

सीनियर असिस्टंट ऑपरेशन्स : 36 हजार ते 1 लाख 10 हजार
सीनियर असिस्टंट वित्त : 36 हजार ते 1 लाख 10 हजार
सीनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स : 36 हजार ते 1 लाख 10 हजार

जाहिरात : PDF 

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---