---Advertisement---
चोपडा

अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरच्या धडकेमुळे तरुण ठार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२३ । अवैध वाळू वाहतुकीकडे पोलीस व महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केले जात असल्याचे नेहेमीच समोर येत आहे. अश्यात जिल्ह्यात अपघात सुरूच आहेत. वाळूने भरलेल्या भरधाव ट्रॅक्टरने पायी चालणार्‍या 30 वर्षीय तरुणास धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू ओढवला.

worker walu mafiya jpg webp webp

हा अपघात रविवारी सकाळी 11 च्या सुमारास अडावद कृषी विद्यालयाजवळ घडला. या अपघातात राजेंद्र झिंगा धनगर (30, रा.कमळगाव ता. चोपडा) या तरुणाचा मृत्यू ओढवला. रााजेंद हा तरुण अडावद-चोपडा मार्गावरील कृषी विद्यालयाजवळ पायी चालत असताना वाळूच्या भरधाव ट्रॅक्टरने राजेंद्र यास जबर धडक दिली.

---Advertisement---

यात त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रॅक्टरचालक रवींद्र विजय कोळी (29, रा. सुटकार ता. चोपडा) यास वाहनासह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृत राजेंद्र धनगर याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परीवार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---