जळगाव लाईव्ह न्यूज । रेल्वेत चढताना तोल जाऊन पडल्याने जळगावातील पिंप्राळा परिसरातील दांडेकर नगरातील तरुणाचा मृत्यू झाला. चेतन (जय) दिनेश पाटील (२०) असे या मृत तरुणाचे नाव असून ही घटना पुणे येथे घडली.

चेतन हा गेल्या काही दिवसांपूर्वीच पुणे येथील एका कंपनीत नोकरीला लागला होता. तो रेल्वेत चढत असताना त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला. त्यातच त्याचा अंत झाला.रेल्वे पोलिसांनी त्याच्याकडील मोबाइलवरील क्रमांकावरून चेतन याच्या मामाला या घटनेची माहिती दिली. यानंतर चेतन याच्या परिवाराला अपघाताची माहिती देण्यात आली.
त्याचा मृतदेह जळगावात आणण्यात आला. त्यावेळी आई, वडील आणि नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. त्याच्यावर पिंप्राळा स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. रेमंड कंपनीतील दिनेश रामभाऊ पाटील यांचा तो पुत्र होत. त्याच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे