⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

20 हजारांची रोकड लांबवणार्‍या तरुणीला चाळीसगावात अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२२ । चाळीसगाव तालुक्यातील भोरस येथील महिलेने शहरातील भडगाव रोडवरील स्टेट बँक शाखेतून रोकड काढल्यानंतर ती पिशवीत ठेवल्याची संधी साधून परप्रांतीय तरुणीने ती लांबवल्याचा प्रयत्न करताच तीला शिताफीने पकडण्यात आले तर तिची सहकारी मात्र पसार झाल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणीच्या अटकेने चोर्‍या उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रोकड लांबवताना तरुणीला अटक
भोरस येथील वंदना दिलीप पाटील (45) यांनी पती दिलीप पाटील यांच्या खात्यातून 50 हजारांची रोकड गुरुवारी दुपारी काढल्यानंतर 20 हजारांची रोकड आपल्या पिशवीत टाकली व ही बाब संशयीतांनी पाहिल्यानंतर धारदार वस्तूने पिशवी कापण्याचा प्रयत्न केला व त्यात वंदना यांच्या हाताला ईजा होताच त्यांच्या घडलेला प्रकार लक्षात आला व त्यांनी आरडा-ओरड केल्यानंतर आरोपी अंजली शिवप्रसाद शिसोदीया (22) हिला पकडण्यात यश आले तर तिची सहकारी मालती धर्मेंद्र शिसोदीया (30, कडिया, पिपलीया, ता.पचोर, जि.राजगड) ही पसार होण्यात यशस्वी झाली. वंदना पाटील यांच्या फिर्यादीनुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अंजलीला अटक करण्यात आली आहे. तपास सहाय्यक निरीक्षक सचिन कापडणीस करीत आहेत.