रविवार, डिसेंबर 10, 2023

गरबा कार्यक्रमात सगळ्यांना चॉकलेट वाटले, नंतर घरी येऊन तरुणाने घेतला गळफास

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२३ । तरुणांमध्ये आत्महत्याचे प्रमाण वाढताना दिसत असून अशातच जळगाव शहरातील अयोध्या नगरात राहणाऱ्या २८ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. विशाल तुकाराम चौधरी (वय-२८) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून याघटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील अयोध्या नगरात विशाल चौधरी हा आईवडील, भाऊ, पत्नी व तीन वर्षाची मुलगीसह वास्तव्याला असून विशालने गल्लीतील नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यानंतर तो घरी गेला असता घरात कुणीही नसतांना किचन रूममध्ये दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.

दरम्यान, त्याची पत्नी हर्षाली या घरात आल्या असता पती विशाल चौधरी यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. पत्नीने आरोडाओरड केल्यांनतर गल्लीतील नागरीक व तरूणांनी धाव घेवून तातडीने खाली उतरवत जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं असता वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी मयत घोषीत केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील प्राथमिक तपास पोहेकॉ सचिन मुंढे, पोहेकॉ आकाश परदेशी करत आहे.

दरम्यान, आत्महत्या करण्यापुर्वी विशालने गरबा कार्यक्रमात सर्वांना चॉकलेट दिले. त्यानंतर मित्रांना शेवटचं मला घरी सोडून द्या असा बोलला होता. त्यानंतर एका मुलाने त्याला घरी दुचाकीन सोडलं त्याला देखील शेवटचं धन्यवाद सांगून घरात निघून गेला. आणि नव्या दोरीने गळफास घेवून जीवनयात्रा संपविली आहे. मात्र विशालच्या आत्महत्या करण्यामागचं कारण अद्यापही समजू शकले नाही