पिंप्राळ्यातील तरुणाला चौघांकडून बेदम मारहाण; गुन्हा दाखल

डिसेंबर 18, 2021 5:51 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ डिसेंबर २०२१ । शहरातील रेडक्रॉस सोसायटील रस्त्याने जावेद पिंजारी (वय २८) हा दुचाकीने जात होता.यादरम्यान, चौघांकडून लोखंडी सळईने बेदम मारहाण केली. या प्रकरणी पिंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

crime 4 jpg webp

सविस्तर असे की, पिंप्राळ्यातील वेल्डिंग कामगार जावेद सिकंदर पिंजारी (वय २८) हा तरुण शुक्रवारी रेडक्रॉस सोसायटी जवळील रस्त्याने त्याच्या (एमएच १९ एएफ ८०१५) या क्रमांकाच्या दुचाकीवरून जात होता. यादरम्यान अचानक डिव्हायडर ओलांडून जावेदच्या दुचाकीसमोर एक अनोळखी तरुण आला. दुचाकीसमोर आलेल्या तरुणाला जावेद तुला दिसत नाही का असे बोलला असता त्याचा राग आल्याने त्यात तरुणांसह आणखी अन्य तीन जणांनी जावेदसोबत वाद घातला तसेच तिघांनी त्याला पकडून ठेवले. तर एकाने लोखंडी पट्टी सह लोखंडी सळईने डोक्यात मारहाण करून दुखापत केली. त्यानंतर चौघेही घटनास्थळावरून पसार झाले. या घटेत जावेद हा जखमी असून त्याच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोकुळ गवारे हे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now