---Advertisement---
पारोळा

पारोळ्याचा तरुण सायकलने निघाला बालाजी दर्शनाला!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२२ । मनात सदिच्छा असेल तर सगळ्या प्रकारे सेवा करता येते देशसेवा हे मनातून कर्तृत्वातून व शारीरिक कार्यातून व्यक्त करता येतेच. परंतु आपल्या कार्याबरोबर धैर्य व शौर्यतून व्यक्त होणे हे विशेष आहे, आपल्या देश हा एकसंघ आहे. या संदेशाबरोबरच पर्यावरण व आरोग्य यासाठी व्यायाम किती आवश्यक आहे आणि तो सायकलच्या माध्यमातून करणे किती गरजेचे आहे हे प्रात्यक्षिकच दाखवण्यासाठी पारोळा येथील एका तरुणाने आपल्या धाडसाचे व निष्ठेचे उदाहरणच समाजापुढे ठेवले, तो म्हणजे घनश्याम ठाकरे.

jalgaon 73

पारोळा शहरातील बालाजी भक्त घनश्याम ठाकरे हे तिरुपती बालाजी दर्शनासाठी सायकलवरून रवाने झाले आहे. ठाकरे यांच्या परिवारातच देशभक्तीचा वारसा असलेले आजोबा शिवदास ठाकरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक होते. शेवटपर्यंत त्यांची आरएसएस व भाजपावर नितांत निष्ठा होती. हेच बाळकडू घेत अवघ्या चोविसाव्या वर्षी धनश्याम याने हा धाडसी निर्णय घेतला. एकट्याने पारोळा ते तिरुपती बालाजी हे चौदाशे किलोमीटरचे अंतर सायकलवरून पार करायचे व रस्त्याने जेथे थांबू जिथे मुक्काम होईल तिथे राष्ट्रभक्ती, राष्ट्रसेवा, एकात्मता व पर्यावरण संरक्षण याविषयी आवर्जून सांगावं माहिती द्यावी. असा उपक्रम या सायकल प्रवासात आहे. त्याच्या या साहसी प्रवासास श्री बालाजी मंदिर पारोळा येथून बालाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन सुरुवात झाली असता त्याला आमदार चिमणराव पाटील यांनी या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

---Advertisement---

तसेच बालाजी मंदिर संस्थान चे विश्वस्त, बालाजी यात्रा स्वयंसेवक मंडळ व पारोळ्यातील तरुण मंडळ यांनी ढोलताशे व डीजेच्या संगीतात त्यास गावाच्या वेशी पर्यंत जाऊन निरोप दिला. त्याच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---