जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील नित्यानंद नगरातील २६ वर्षीय तरुणाने रेल्वे स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. विकास बापू हटकर असं मयत तरुणाचं नाव आहे. विशेष एका खासगी कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली, मात्र तेथे हजर होण्यापूर्वीच त्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नित्यानंद नगरमधील रहिवासी विकास हटकर हे पत्नीसह राहत होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते तणावात होते. विकास यांची काही दिवसांपूर्वीच जळगावातील एका खासगी कंपनीत नोकरीसाठी निवड झाली. तेथे ते काही दिवसांत हजर होणार होते. मात्र, त्यापूर्वीच ते गुरुवारी मध्यरात्री घरातून निघून गेले. त्यानंतर गिरणा पंपिंग रस्त्यावरील रेल्वे बोगद्याच्या काही अंतरावर जाऊन त्यांनी स्वतःला रेल्वे समोर झोकून दिले.

ही घटना लक्षात आल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाने तालुका पोलिसांना माहिती लगेचच या घटनेबाबतची कळविली.दुचाकीवरून पटली ओळखसुरुवातीला अनोळखी म्हणून मृताची नोंद करण्यात आली होती. मात्र, घटनास्थळापासून काही अंतरावर दुचाकी लावलेली होती. या दुचाकीच्या क्रमांकावरून विकास हटकर यांची ओळख पटली. तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस हेड कॉन्स्टेबल धनराज पाटील व श्रीकांत बदर हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तरुणास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.











