⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | गुन्हे | वाराणसी-कुर्ला एक्स्प्रेसमधून साडेसहा लाखांचे दागिने‎ असलेली महिलेची पर्स केली लंपास‎

वाराणसी-कुर्ला एक्स्प्रेसमधून साडेसहा लाखांचे दागिने‎ असलेली महिलेची पर्स केली लंपास‎

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज । १४ जुलै २०२२ । भुसावळ‎ वाराणसी-कुर्ला एक्स्प्रेसमधील‎ प्रवासी महिलेची पर्स चोरट्याने ‎ लांबवल्याची घटना ६ जुलैला‎ घडली. पर्समध्ये सुमारे साडेसहा ‎ ‎ लाखांचे दागिने होते. याप्रकरणी‎ कुर्ला पोलिसात गुन्हा दाखल‎ झाल्यावर ताे गुन्हा भुसावळ‎ लोहमार्ग पोलिसात वर्ग करण्यात‎ आला.‎

चार्टर्ड अकाऊंटंट सुजितकुमार‎ उपाध्याय (रा. रावळपाडा, दहिसर,‎ मुंबई) हे पत्नी, मुले व बहिणीसह ६‎ जुलैला अप १२१६८ वाराणसी-मुंबई‎ एक्स्प्रेसच्या कोच बी-४ मधील बर्थ‎ क्रमांक १०, ११ व १५ वरून प्रवास‎ करत होते. खंडवा-भुसावळ‎ ‎ दरम्यान उपाध्याय कुटुंबातील‎ सदस्यांना झोप लागली. ही संधी‎ चोरट्यांनी साधत उपाध्याय यांच्या‎ पत्नीची पर्स लांबवली.

या पर्समध्ये‎ ३० ग्रॅमचे मंगळसूत्र, ३५ ग्रॅमच्या‎ सोन्याच्या तीन चेन, २५ ग्रॅमच्या चार‎ सोन्याच्या अंगठ्या, २० ग्रॅमची‎ कर्णफुले, तीन ग्रॅमचे सोन्याचे पेंडल‎ व तीन हजार ५०० रुपयांची रोकड‎ ‎ ‎ ‎‎ ‎ मिळून सहा लाख ४३ हजार ५००‎ रुपयांचा ऐवज होता. उपाध्याय यांनी‎ कुर्ला लोहमार्ग पोलिसात तक्रार‎ दिली. पुढील तपास पोलिस‎ निरीक्षक विजय घेरडे यांच्या‎ मार्गदर्शनाखाली पाेलिस करत‎ आहेत. रेल्वे प्रवासात प्रवाशांनी‎ मौल्यवान वस्तू सोबत बाळगू नये,‎ असे आवाहन केले आहे.‎


आरपीएफने गस्त वाढवावी‎ रेल्वे गाड्यांमध्ये जनरल प्रवासी वाहतूक सुरू झाल्याने प्रवाशांची गर्दी‎ वाढली अाहे, यामुळे अारक्षण डब्यासाेबतच एसीच्या डब्यात बसूनही‎ प्रवासी अवैधपणे प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या मौल्यवान‎ साहित्याची सुरक्षा धोक्यात येते. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाने धावत्या‎ गाडीतील गस्तीत वाढ करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून केली‎ जात अाहे. प्रवाशांनीदेखील मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात.‎

author avatar
टीम जळगाव लाईव्ह