---Advertisement---
आरोग्य महाराष्ट्र

तरुण वयात मेंदूज्वर झालेल्या महिलेला मिळाले जीवदान

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२३ । हलाखीच्या परिस्थितीत जगत असलेल्या परिवारातील महिलेला मेंदूज्वर व मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये असलेल्या रक्ताच्या गाठीच्या आजाराचे निदान झाले. महिलेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव या ठिकाणी यशस्वी उपचार झाले आहेत. वैद्यकीय पथकाने आपले कौशल्य पणाला लावून सदर महिलेचा जीव वाचवण्यात यश मिळविले. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी वैद्यकीय पथकाचे कौतुक करून महिलेला रुग्णालयातून निरोप दिला.

civil jpg webp webp

धरणगाव तालुक्यातील चामखेडा येथील २१ वर्षीय महिला ज्योती भिल हिला सारखा ताप येत होता. तिव्र स्वरुपात डोके दुखून चक्कर येत होते. तसेच चिडचिडेपणा, अशक्तपणा देखील जाणवत होता. त्यामुळे तिला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाईकांनी दाखल केले. या ठिकाणी औषधवैद्यक शास्त्र विभागाच्या पथकाने तपासणी केली. त्यावेळेला विविध तपासणीअन्ति मेंदूजवर असल्याचे निदान झाले.

---Advertisement---

त्याचबरोबर मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी झाल्याचेही निदान झाले. तातडीने महिलेला अतिदक्षता विभागात ठेवून औषधोपचार करण्यात आले. तिथून यशस्वीपणे ती बरी झाल्यानंतर तिला जनरल कक्षात दाखल करण्यात आले होते. सुमारे २५ दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर ती बरी झाली. त्यामुळे तिला अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांच्या उपस्थितीत रुग्णालयातून निरोप देण्यात आला.

सदर महिलेवर उपचार करण्याकामी डॉ. विजय गायकवाड, डॉ. दुष्यंत पवार, डॉ. सुनील गाजरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अमित भंगाळे, डॉ. नेहा भंगाळे, डॉ. गजानन परखड, डॉ. विशाल आंबेकर, डॉ. सत्यजित सातपुते, इन्चार्ज परिचारिका यशोदा जोशी आदींनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---