जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२२ । शहरातील एका भागात वास्तव्यास असलेल्या, पाणीपुरी विक्री करणार्या ४८ वर्षीय महिलेकडे शरीरसुखाची मागणी करून विनयभंग केल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीसात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सईद खाटीक (पूर्ण नाव माहित नाही) असे संशयीताचे नाव आहे. संशशीत सईद खाटीक या इसमाचे चिकन विक्रीचे दुकान असून त्याने 48 वर्षीय पीडीत महिलेला आपल्या दुकानावर बोलावत तुझ्याकडे सेटींग लावायची आहे. ‘कुछ भी करके मेरी सेटींग लगानी पडेगी’, असे म्हणत त्याने पीडीत महिलेकडे शरीरसुखाची मागणी करत तिचा विनयभंग केला.
याप्रकरणी महिलेने एमआयडीसी पोलिस स्टेशनला धाव घेत तक्रार दिल्यानंतर सईद खाटीक याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहेत.