विक्रमी विजय ! विष्णू भंगाळे झाले पाचव्यांदा सिनेट सदस्य

जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२३ । जळगाव जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा विद्यापीठ महाविकास आघाडीचे प्रमुख विष्णू भंगाळे यांनी विद्यापीठाच्या अविसभेवर पाचव्यांदा विजय संपादन केला. त्याचा हा विजय ऐतिहासिक विजय ठरला आहे.

कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेट पदवीधर मधून निवडून येणाऱ्या दहा जागांसाठी नुकतेच मतदान झाले. या निवडणुकीमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद प्रणित विद्यापीठ विकास मंचाला स्पष्ट बहुमत मिळाले तर दुसरीकडे विद्यापीठ महाविकास आघाडीचा दणाणून पराभव झाला. नऊ जागा या विद्यापीठ विकास मंचाला मिळाल्या तर एक जागा ही विद्यापीठ महाविकास आघाडीला मिळाली

असं जरी असलं तरी जिल्हाप्रमुख तथा विद्यापीठ महाविकास आघाडी पॅनलचे प्रमुख यांनी मात्र आपली जागा आबादीत राखत यश मिळवले यांनी लागोपाठ पाचव्यांदा विजय मिळवून अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे काल रात्री उशिरा हा निकाल जाहीर झाला यावेळी बंगाळे यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला.