⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 10, 2024
Home | गुन्हे | घाईत बसमध्ये चढणे वृद्ध महिलेच्या जीवावर बेतले ; चाकाखाली आल्याने मृत्यू

घाईत बसमध्ये चढणे वृद्ध महिलेच्या जीवावर बेतले ; चाकाखाली आल्याने मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२४ । यावल तालुक्यातील किनगाव येथे एक दुर्दैवी घटना समोर आलीय. घाई करीत बसमध्ये चढत असताना बऱ्हाणपूर- सुरत बसच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झालेल्या अहमदाबाद येथील ८१ वर्षीय वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज १२ सप्टेंबर रोजी घडली. कमलबाई रामराव एंडाईत (वय ८१, रा. अहमदाबाद,गुजरात) असे मयत महिलेचे नाव असून याबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक नोंद घेण्याचे काम सुरु होते.

काय आहे घटना?
गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरात परिवारासह राहत असलेल्या कमलबाई एंडाईत या किनगाव येथे गुरुवारी काही कामानिमित्त आल्या होत्या. त्यानंतर अहमदाबादकडे जाण्यासाठी त्या किनगाव बसस्थानक येथे सकाळी १० वाजता आल्या. तेव्हा रावेर आगाराची बस क्रमांक (एमएच २० बीएल ३३९७) हि बऱ्हाणपूरवरून सुरतकडे जाणारी बस किनगाव येथील बसस्थानकावर आली.

हि बस थांबण्यापूर्वीच बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली. या गर्दीत कमलबाई या बसच्या मागील चाकाखाली आल्याने खाली पडल्या. त्याचवेळी बसचे मागील चाक या महिलेच्या दोन्ही पायावरून गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. जखमी महिलेला नागरिकांनी तातडीने जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले होते. तेथे अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली आहे. यावेळी कुटुंबीयांनी रुग्णालयात आल्यावर शोक व्यक्त केला. अपघातग्रस्त बस किनगाव बस स्थानकावर थांबून आहे. यावल पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती जाणून घेतली. तर जिल्हापेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक नोंद करण्यात येत होती.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.