---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

नशिराबादजवळ भरधाव कारने रिक्षाला उडविले ; एक महिला जागीच ठार, चार जण गंभीर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२३ । महार्गावरील नशिराबाद येथील उड्डाणपुलावर बुधवारी सायंकाळी भरधाव कारने रिक्षाला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघात एक महिलेचा जागीच मृत्यू झाल्या तर त्यांच्यासोबत असलेले चार प्रवासी गंभीर जखमी झाले. आस्माबी शेख मंजूर (वय ३०, रा. बोरखेडी ता. मोताळा, जि. बुलढाणा) असं अपघातातील मृत महिलेचं नाव आहे. यातील जखमी चौघांवर गोदावरी हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहे.

nashirabad riksha accident jpg webp

नेमकी काय आहे घटना?
जळगावकडून प्रवासी रिक्षा(एमएच १९ बीयू ५८४३) कलर घेवून बुधवारी सायंकाळच्या सुमारास भुसावळकडे जात होते. याचवेळी नशिराबाद गावाजवळील उड्डाणपुलावर मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या (एमएच १९ इए ५१०९) क्रमांकाच्या कारने रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. कारने दिलेली धडक इतकी जोरात होती की,रिक्षाचा अक्षरक्ष: चक्काचूर झाला.

---Advertisement---

या अपघात रिक्षामधील महिला आस्माबी शेख मंजूर यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना लागलीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर त्यांच्यासोबत असलेली इतर चौघे प्रवासी गंभीर जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्र्वर मोताळे, सहाय्यक फौजदार हरिष पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, या अपघातात रिक्षातील जुबेर शेख मेहबुब शेख (वय ४०), करीम बेग शरीफ बेग (वय २९), शेख सादीक शेख इसार (४०) व शेख उमेमा शेख जुबेर (वय ६) हे चौघेजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर गोदावरी हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---