आपला समाज सुदृढ असेल, तरच व्यावसायिक प्रगती होणे शक्य आहे. सुदृढ समाज हाच व्यावसायिक यशाचा पाया आहे. गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्यासारखी व्यक्तिमत्त्वे आपल्या व्यवहारांतून सशक्त समाजाची पायाभरण करत असतात.
गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील (Dr Ulhas Patil) यांचा २३ फेब्रुवारी हा जन्मदिवस. जळगाव जिल्ह्यातील रावेर (Raver) तालुक्यातील विवरे या छोट्याशा गावात डॉ. उल्हास पाटील यांचा जन्म झाला. आई गोदावरी आणि वडील वासुदेव पाटील हे शिक्षक असल्याने शिक्षण वाघीणीचे दूध असल्याचे बाळकडू लहानपणापासूनच त्यांना मिळाले. घरची परिस्थिती बेताची असली तरी मुलांनी शिकून सवरून समाजसेवा करावी असा ध्यास आई गोदावरी पाटील यांनी उराशी बाळगला होता. हा ध्यास उल्हास पाटील यांनी डॉक्टर होऊन पूर्ण केला. जळगाव जिल्ह्यात बोटावर मोजण्याइतपत स्त्रीरोग तज्ञ कार्यरत होते. त्यात डॉ. उल्हास पाटील हे देखिल एक होते. सुरूवातीच्या काळात जळगाव जिल्हा सामान्य रूग्णालयात स्त्रीरोग विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी सेवाकार्य केले. या सेवाकार्याला डॉ. उल्हास पाटील यांनी राजकारणाची जोड दिली. सन १९९८ मध्ये डॉ. उल्हास पाटील हे जळगाव लोकसभेतून खासदार म्हणून निवडून आले.
जळगाव मतदारसंघाला प्रथमच एक व्हिजनरी नेतृत्व लाभले. जळगाव जिल्ह्यात उच्च शिक्षणाच्या सोयी सुविधा आणि इन्फ्रास्ट्रक्चर असावे हे ध्येय त्यांनी बाळगले होते. या ध्येयाकडे वाटचाल करीत असतांना डॉ. उल्हास पाटील यांनी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, गोदावरी आयएमआर महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी या स्किल्ड बेस शिक्षणसंस्थांची उभारणी केली. परिणामी खान्देशातील टॅलेंटचा खान्देशातच वापर होऊ लागला. तसेच या संस्थांच्या माध्यमातून हजारो हातांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे कार्य त्यांनी केले. ही प्रगती काही एका दिवसात, एका वर्षात झाली नाही. त्यासाठी दुरदृष्टी, कठोर परिश्रम, अडचणींसोबत संघर्ष देखिल डॉ. उल्हास पाटील यांनी केला आहे. परिस्थिती कशीही असो प्रयत्नात सातत्य ठेवा असा संदेश डॉ. उल्हास पाटील नेहमीच देत असतात.
विकासाच्या वाटेवरील सहकारी
देशातच नव्हे तर जगात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बोलबाला आहे. गत दहा वर्षात जागतिक पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. भारत एक सुपरपॉवर म्हणून उदयाला येत आहे. भारताची अर्थव्यवस्था ही ३.७ ट्रीलीयन डॉलर्स पर्यंत पोहोचली आहे. आपला देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगातील तिसरी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे. आर्थिक, सामाजिक, आरोग्य, युवाकल्याण, इन्फ्रास्ट्रक्चर या सर्वच क्षेत्रात भारताने मोठी झेप घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसीत भारताचा नारा दिला आहे. त्याला साथ देण्यासाठी माजी खा. डॉ. उल्हास पाटील आणि त्यांच्या कन्या डॉ.केतकी पाटील हे देखिल विकासाच्या वाटेवरील सहकारी झाले आहेत. गावपातळीपर्यंत विकासाच्या योजना पोहोचविण्यासाठी डॉ. उल्हास पाटील यांचे सेवाकार्य अविरतपणे सुरू असून सशक्त समाजनिर्मीतीचे ध्येय असल्याचा त्यांचा मानस आहे.
माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त पंधरवाडा आरोग्य शिबिर व कमलदृष्टी अभियान
माजी खा.डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त पंतप्रधान मोदीजी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांतर्गत दि २३ ते ८ मार्चपर्यंत पंधरवाडा आरोग्य शिबिर व कमलदृष्टी अभियानाचे आयोजन डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदीजींनी प्रधानमंत्री जन—आरोग्य योजनांतर्गत सर्वसामान्यांना ५ लाख रूपयापर्यंतच्या उपचाराचा लाभ मिळवून दिला आहे. मोदीजींचे आभार मानत माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त पंधरवाडा आरोग्य शिबिर व कमलदृष्टी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे तज्ञ डॉक्टर तपासणी करणार असून सर्व आजारांचे शस्त्रक्रिया व उपचार देखिल मोफत केले जाणार आहे.
शिबिराचा लाभ मिळवण्यासाठी आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड व ओरीजीनल रेशनकार्ड तसेच आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. कमलदृष्टी अभियानात ६४ व्या वाढदिवसानिमीत्त प्रथम येणा—या ६४ रूग्णांवर फेको पध्दतीने मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. अभियानासाठी नावनोंदणी करणे आवश्यक असून आशिष भिरूड ९३७३३५०००९ या क्रमांकवर संपर्क साधावा.कमलदृष्टी अभियानात वैद्यकिय आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक वैद्यकिय आघाडीचे नेत्ररोग तज्ञ डॉ. नि.तु पाटील तपासणी,मार्गदर्शन व शस्त्रक्रिया करणार आहे. कमलदृष्टी अभियानात सहभागी होण्यासाठी ८०५५५९५९९९ या क्रमांकवर डॉ. नि.तु. पाटील यांचेशी संपर्क करावा. तरी जास्तीत जास्त रूग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन रूग्णालय प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.