⁠ 
शनिवार, सप्टेंबर 14, 2024
Home | गुन्हे | आमदारानंतर आता पत्रकाराच्या सतर्कतेमुळे मुक्ताईनगरात गुटख्याने भरलेले वाहन पकडले

आमदारानंतर आता पत्रकाराच्या सतर्कतेमुळे मुक्ताईनगरात गुटख्याने भरलेले वाहन पकडले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२४ । मुक्ताईनगर तालुक्यात पुन्हा एकदा वैध गुटख्याने भरलेले वाहन पकडण्यात आले आहे. विशेष म्हणजे एका पत्रकाराच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून गुटख्याने भरलेले वाहन मुक्ताईनगर पोलिसांनी जप्त केले आहे.

खरंतर महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी आहेत. मात्र महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात गुटख्याची सर्रासपणे विक्री होत असल्यामुळे महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांच्या बॉर्डवरील मुक्ताईनगर या भागातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी किंवा वाहतूक होत असल्याचे निर्दशनास आले आहे. गेल्या आठवड्यात मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी गुटखा तस्कराचे वाहन पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलेली होती. मात्र यानंतर हे वाहन पकडून ते परस्पर सोडून दिल्याच्या प्रकरणात पीएसआयसह चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

या प्रकाराला काही दिवस उलटत नाहीत तोच शुक्रवारी मध्यप्रदेशातील बुरहाणपुर वरुन मुक्ताईनगर मार्गे जळगाव येथे जात असलेला लाखो रुपयांचा गुटखा पत्रकार यांनी मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात दिली. बोदवड तालुक्यातील पत्रकारांचा एक ग्रुप हा रावेर येथे आज जात असतांना समोरच्या बाजूने म्हणजेच बऱ्हाणपूरकरून एमएच15 एचएच 1088 या क्रमांकाचे बोलेरो पीकअप हे वाहन प्रचंड वेगाने जातांना त्यांना दिसून आले. यामुळे पत्रकारांना शंका वाटल्याने त्यांनी आपले वाहन वळवून या वाहनाचा पाठलाग केला. पुरनाड येथील चेकपोस्टच्या जवळ त्यांनी बोलेरोला गाठले असता यात त्यांना गुटखा असल्याचे आढळून आले.

दरम्यान, या संदर्भात मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे यांना या संदर्भात माहिती देण्यात आली. यावरून पोलिसांनी तात्काळ पुरनाड चेक पोस्टवर जाऊन बोलेरो पीकअप वाहन जप्त करून पोलीस स्थानकात आणले. या संदर्भात पोलिस प्रशासनाशी संपर्क केला असता त्यांनी या कारवाईला दुजोरा दिला असून याबाबत शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.