गुन्हेजळगाव जिल्हा

जामनेरमध्ये बर्निंग ट्रॅक्टरचा थरार, पाच क्विंटल कापूस राख

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । जामनेर तालुक्यातील पाळधी गावात महामार्गावरून कापूस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरने अचानक पेट घेतला; त्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उलटला. यात सातजण जखमी झाले असून पाच क्विंटल कापूस जळून खाक झाला आहे.

किशोर परदेशी हे ट्रॅक्टर घेऊन घरी परतत होते. त्यांच्यासोबत काही शेतमजूर होते. ट्रॉलीत रोटाव्हेटर मशीन आणि कापसाचे गड्ढे ठेवले होते. या ट्रॅक्टरने अचानक पेट घेतल्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. यात सातजण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सविताबाई परदेशी, योगिता परदेशी, पूजा परदेशी, आरती परदेशी, वैशाली धनगर, हिराबाई परदेशी यांचा समावेश आहे. यात, ट्रॅक्टर आणि कापूस जळून खाक झाला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button