---Advertisement---
बातम्या

टॉवर चौकात झाला भीषण अपघात : डंपरने दिली कारला धडक

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२३ । जळगाव शहरातील टॉवर चौकात भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने कारला जोरदार धडक दिल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कारण या अपघातात कारमधील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

car jpg webp webp

जळगाव शहरातील टॉवर चौकात शुक्रवारी २४ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास कार क्रमांक (एमएच १९ बीजे ७९१७) ही नेहरू चौकाकडून टॉवर चौकात येत होते. त्याच वेळी शिवाजी नगरकडून चित्रा चौकात जात असलेला डंपर (एमएच १९ झेड ४१००) ने कारला डाव्याबाजूने जोरदार धडक दिली. या धडकेत कारमध्ये बसलेले शिक्षिका सविता अशोक सानेवणे (वय-४०) रा. रामानंद नगर, जळगाव आणि शिक्षक विठ्ठल रूपसिंह चव्हाण (वय-४२) आणि सोबत असलेले रजियाबाद तडवी हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

---Advertisement---

यावेळी जवळच असलेल्या शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेवून जखमींना उपचारासाठी रवाना करण्यात आले. तिघांना शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, अपघात घडल्यानंतर डंपर चालक हा डंपर सोडून पसार झाला होता. यावेळी शहर पोलीसांनी कार व डंपर शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. या घटनेबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---