⁠ 
मंगळवार, जानेवारी 7, 2025
Home | गुन्हे | धक्कादायक! सोबतचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार

धक्कादायक! सोबतचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२३ । महिलांसह मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबता थांबत नसून अशातच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोबतचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार करीत त्रास देणाऱ्या संशयित नराधम तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.दानिश तडवी ( वय १९, रा. रामेश्वर कॉलनी जळगाव) असं या तरुणाचे नाव आहे.

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात १८ वर्षीय तरुणी कुटुंबासह राहते. ही तरुणी अल्पवयीन असताना सन २०१९ पासून संशयित दानिश तडवीला ओळखत होती. त्यानंतर ओळखीचा गैरफायदा घेत दानिशने तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी नेत सुरूवातीला अश्लील कृत्य केले. त्याचे फोटो आणि व्हिडीओदेखील बनविले. त्यानंतर पुन्हा सन २०२२ मेहरुण परिसरात एका ठिकाणी तिला नेऊन फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा त्रास देणे सुरूच होते. हा त्रास सहन न झाल्याने पीडित तरुणीने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला.

त्यानुसार शनिवार, ७ ऑक्टोबर रोजी तरुणीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दानिश तडवी याला रामेश्वर कॉलनी परिसरातून अटक केली.त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.