---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

जळगावात घरासमोर लावलेली रिक्षा पेटवली; अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

riksha fire
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावमध्ये गुन्हेगारी वाढताना दिसत असून शहरातील छत्रपती शिवाजीनगरात अज्ञात व्यक्तीने घरासमोर लावलेली रिक्षा पेटवून दिली. ही घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

riksha fire

याबाबत असे की, अजय राजेंद्र जगताप (वय-३४, रा. लाकूडपेठ छत्रपती शिवाजीनगर जळगाव) हा तरुण रिक्षा चालवत आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. त्यांच्याकडे राजू गणपत चौरे यांच्या मालकीची ऑटो रिक्षा क्रमांक एमएच १९ सीडब्ल्यू ६३४८) घरासमोर लावलेली असतांना गुरुवारी ६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अज्ञात माथेफिरू व्यक्तीने नुकसान व्हावे या हेतूने सदरील प्रवाशी रिक्षा पेटवून दिली.

---Advertisement---

या आगीत संपूर्ण पेक्षा जळून खाक झाली आहे. त्यामुळे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. यासंदर्भात रिक्षा चालक अजय जगताप यांनी जळगाव शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल ओमप्रकाश सोनी हे करत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---