⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 12, 2024
Home | गुन्हे | खुनाच्या घटनेनं चोपडा तालुका हादरला

खुनाच्या घटनेनं चोपडा तालुका हादरला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ सप्टेंबर २०२४ । जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी डोकंवर काढताना दिसत असत असून अशातच चोपडा तालुक्यातून खुनाची घटना समोर आलीय. यावल चोपडा मार्गावरील हजरत पीर पाखरशाह बाबांच्या दर्यासमोरील मोकळ्या जागेवर पाटचारी परिसरात राहणाऱ्या मजुराचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. जगदीश फिरंग्या बारेला (४५) असे खून झालेल्या मजुराचे नाव असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, खून कोणी व का केला, हे प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत. त्याच्या डोक्यावर व अंगावर गंभीर जखमेच्या खुणा असल्याने तसेच गळ्याभोवती फास आवळल्याची निशाणी दिसल्याने कुणीतरी अज्ञातांनी रात्री त्याचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. अडावदचे स.पो.नि. प्रमोद वाघ, पो.उ.नि. राजू थोरात, भरत नाईक, भूषण चव्हाण, गणेश बोरसे, सागर बागुले, संजय माळी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

श्वानपथकाने संशयितांचा काही अंतरापर्यंतच माग दाखवला. वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट चोपड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी अडावदला दिवसभर तळ ठोकला. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उ.नि. गणेश वाघमारे, अनिल जाधव, ठसेतज्ज्ञ स.पो.नि. फड हेदेखील दाखल झाले. ठसेतज्ज्ञांनी घटनास्थळावरील परिस्थितिजन्य पुरावे घेतले आहेत. घटनास्थळी पोलिसांना एमपी ४६ एमएल ६८८९ या क्रमांकाची मोटारसायकल आढळून आली आहे. मृताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.