चोपड्यातील अल्पवयीन मुलीवर विनयभंग अन् कुटुंबियांनाही मारहाण

ऑक्टोबर 28, 2022 5:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२२ । चोपडा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला तसेच याबाबत जाब विचारल्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांना ही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी अडावद पोलिसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

crime 2022 06 14T110327.149

तालुक्यातील एका गावातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परीवारासह वास्तव्यास आहे. गुरुवार, 27 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास पीडित मुलीच्या आई व मावशीसह शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली तसेच मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्या प्रकरणी दीपक भीमा ठाकरे, संदीप भीमा ठाकरे व समाधान विक्रम ठाकरे यांच्याविरोधात अडावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास एएसआय जगदीश कोळंबे हे करीत आहेत.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now