जळगाव लाईव्ह न्यूज । ११ फेब्रुवारी २०२२ । एरंडोल तालुक्यातील एका गावातील १७ वर्षे २ महीने वयाच्या अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात इसमाने काहीतरी आमीष दाखवुन पळवुन नेल्याची घटना दि. ८ मंगळवार रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. ८ मंगळवार रोजी मुलीची आई शेतात कामास गेली होती व वडील पिठाच्या गिरणीवर कामास गेले होते. त्यावेळी मुलगी ही एकटीच घरी होती. तीची आई संध्याकाळी शेतातुन परतल्यावर घराला कुलुप लावलेले आढळुन आले. मुलीची चौकशी केली असता ती मिळुन आली नाही. तीच्या मोबाइल वर संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.
सदर मुलीचा गावात शोध घेतला असता ती मिळुन आली नाही म्हणुन पित्याने शेवटी पोलिस ठाणे गाठुन आपल्या मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने आमीष दाखवुन, फूस लावून पळवुन नेल्याची तक्रार दिली. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड काँन्सटेबल राजेश पाटील, काशिनाथ पाटील हे पुढील तपास करीत आहेत.
हे देखील वाचा:
- महापालिका पाईप चोरी प्रकरणी सुनील महाजन यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- Amalner : घरफोड्या करून पैसे जमविले, कार खरेदी करण्यासाठी गेला अन् तिथेच अडकला
- दुचाकी वाहनांकरिता नविन नोंदणी क्रमांकाच्या मालिकेस 09 डिसेंबर पासून सुरुवात
- महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर ; वाचा कोण-कोण घेणार मंत्रिपदाची शपथ?
- गुलाबराव पाटील आणि संजय शिरसाट सांभाळणार शिवसेनेचा मोर्चा; हातात असणाऱ्या कागदपत्रांबाबत चर्चा