---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

भयंकर! अत्याचारातून अल्पवयीन मुलगी सहा महिन्याची गर्भवती

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२४ । जळगाव जिल्ह्यात मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबताना दिसत नसून अशातच वरणगावमधून एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. धक्कादायक म्हणजे पीडित मुलगी सहा महिन्याची गर्भवती निघाली. याप्रकरणी संशयिताविरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime jpg webp

वरणगाव परिसरातील एका गावात आईला मुलीच्या प्रकृतीवर संशय आल्याने आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली. तिने सर्व घटना सांगितली असता आईला धक्काच बसला. डॉक्टरकडे तपासणीसाठी नेले असता तिच्या पोटात सहा महिन्यांचा गर्भ असल्याचे समजले. त्यावरून पीडित मुलीने सांगितल्यानुसार घराशेजारील राहणारा नीलेश संजू निळे या तरुणाने अंदाजे ७ महिन्यांअगोदर त्याचे घरातील हॉलमध्ये अत्याचार केला होता.

---Advertisement---

त्यानंतर पुन्हा ५ सप्टेंबर २०२४ रोजी घरात बोलावून अत्याचार केल्याची हकीकत पीडित मुलीने तिच्या आईला सांगितल्यामुळे ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी वरणगाव पोलिसांत पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित नीलेश संजू निळे याच्या विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम ६४ (२) एम ३५१ (१) (२) पोस्को कायद्याचे ४, ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सह पोलिस निरीक्षक सुशील सोनवणे करीत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---