Chopda : चारचाकीच्या धडकेत दिड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, गाडीचालकावर गुन्हा दाखल

जानेवारी 25, 2025 11:56 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । चोपडा तालुक्यातील अडावद येथे अपघाताची दुर्दैवी घटना समोर आलीय. ज्यामध्ये चारचाकीने दिड वर्षाच्या चिमुकलीस जोरदार धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. प्रियांशी संदिप पाटील असं मृत चिमुकलीचे नाव आहे. दरम्यान याबाबत मयताच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

adavad acd

या घटनेबाबत असे की, सुवर्णा संदिप पाटील या त्यांच्या घरासमोर असले दुकानात ताक घेण्यासाठी जात असताना त्यांच्या मागोमाग प्रियांशी रस्ता ओलांडत होती. याचवेळी ग्रामपंचायतीकडून चांग्यानिम चौकाच्या दिशेने भरधाव येणाऱ्या महिंद्रा मॅझिमो ( क्रमांक : MH-39-J-7424) या गाडीने दिड वर्षाच्या प्रियांशीला जोरदार धडक दिली. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला.

गाडीच्या पुढील व मागील उजव्या बाजूच्या चाकाखाली प्रियांशी आल्याने ती गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.घटनेनंतर मयत प्रियांशीच्या आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीच्या आधारे आरोपी गाडीचालक पंकज अरुण धनगर, ( राहणार कमळगाव, ता. चोपडा ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भरत नाईक करत आहेत. घटनेनंतर अडावद गावात शोककळा पसरली आहे. ग्रामस्थांनी या घटनेची चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now