---Advertisement---
जळगाव जिल्हा

आडगाव येथील शिवारात आढळले बिबट्या व त्याचे दोन बछडे; शेतकऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज| २६ ऑगस्ट २०२३। आडगाव येथील शिवारात एका उसाच्या शेतात शेतकरी प्रवीण नामदेव पवार यांच्या उसाच्या शेतात बिबट्या व त्याचे दोन बछडे आढळले. प्रवीण पवार यांचा मुलगा शिवप्रसाद ऊर्फ सोमनाथ हा शुक्रवारी (ता. २५) दुपारी चारच्या सुमारास उसाच्या शेतात काम करीत असताना बिबट्या व त्याचे लहान दोन बछडे आढळले. शिवप्रसाद हा कामात व्यस्त असताना त्याचे समोर असलेल्या बिबट्याकडे लक्ष नव्हते.

image 93 jpg webp webp

त्याला पाहून बिबट्याने डरकाळी फोडली व त्याच्या अंगावर झडप घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने कसाबसा जीव वाचवत शेताबाहेर येऊन इतरांना माहिती दिली. दरम्यान, ग्रामस्थ येईपर्यंत मादी एका पिलाला घेऊन पसार झाली. दुसरे पिल्लू मात्र तेथेच असून, त्याला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

---Advertisement---

दरम्यान, घटनास्थळी वन विभागाकडून पिंजरा लावण्यात आला असून, शेतकऱ्यांनी न घाबरता दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. येथील शिवप्रसाद उसाच्या बाहेर आला व त्याने त्याचे काका रवींद्र पवार व चुलत भाऊ अजय पवार यांना आवाज देत घडलेला प्रकार सांगितल्यावर रवींद्र पवार, सोमनाथ पवार, अजय पवार, बबलू पाटील, प्रवीण पवार हे लाठ्याकाठ्या घेऊन उसाच्या पिकात गेले.

त्यांच्या आवाजाने बिबट्या त्याचे एक पिल्लू घेऊन पळून गेला आणि एक पिल्लू त्याच जागेवर होते. त्यांनी लगेच वन विभाग, एरंडोल येथे फोन करून घडलेला प्रकार सांगितला. बिबट्याच्या त्या लहान पिलाला रवींद्र पवार, सोमनाथ पवार, अजय पवार, प्रवीण पवार, बबलू पाटील यांच्यासह काही शेतकऱ्यांनी उचलून कॅरेटमध्ये ठेवून सुरक्षित ठिकाणी ठेवले.

गावात ही बातमी समजताच सरपंच सुनील भिल, जितेंद्र पाटील, करीम मण्यार, सुनील पाटील, संजय पवार यांच्यासह अनेक शेतकरी पाहण्यासाठी शेतात आले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा घटनास्थळी आणला. रात्री उशिरा शेतात दिवे लावणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---