---Advertisement---
जळगाव जिल्हा

आरक्षण हक्क परिषदेत ओबीसी बांधवांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२१ । ओबीसी आरक्षण व त्या सोबत एस.सी, एस.टी आरक्षण आवश्यक असून यासाठी दि. २५ रोजी होणाऱ्या ओबीसी आरक्षण हक्क परिषदेमध्ये जास्तीत जास्त ओबीसी बांधवांनी आपल्या हक्कांसाठी उपस्थित राहून चर्चेत सहभागी व्हावे असे आवाहन लोकसंघर्ष समितीच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी केले.

यावल येथील खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात बुधवार दि. २२ रोजी ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पणन महामंडळाचे संचालक संजय पवार, सिनेट सदस्य तथा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, एजाज साहेब, सालार शेख आदी उपस्थित होते. याप्रसंगी यावल तालुक्याच्यावतीने ऍड. देवकांत पाटील यांनी प्रतिभा शिंदे यांचा सत्कार केला. शिंदे यांनी आपल्या १९३३ पासूनची आरक्षणाची पार्श्वभूमी सांगून ओबीसी आरक्षण व त्याची गरज आणि त्याचे महत्व, त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न, त्यासाठी सामाजिक जनगणनेचे महत्त्व याविषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी निवृत्ती धांडे, नरेंद्र पाटील, भागवत पटवाल, मनसेचे चेतन अडळकर, खरेदी-विक्री संघाचे संचालक अमोल भिरूड यांसह असंख्य ओबीसी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत चौधरी यांनी तर सूत्रसंचालन ऍड. देवकांत पाटील यांनी केले. आभार मनसेचे चेतन अडळकर यांनी मानले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---