गुन्हेजळगाव जिल्हा

अबब..! जळगावातील लाचखोर विद्युत निरीक्षकाकडे सापडले मोठे घबाड..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ फेब्रुवारी २०२४ । उद्योगासाठी लागणाऱ्या विद्युत परवान्याच्या नूतनीकरणासाठी १५ हजारांची लाच घेणाऱ्या विद्युत निरीक्षक गणेश नागों सुरळकर (चय ५२) बाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. यांनतर एसीबीने गणेश सुरळकराच्या कार्यालय व घराची झडती घेतल्यावर मोठे घबाड आढळून आले. एसीबीला पावणेतीन लाखांची रोकड व ३० लाख रुपये किमतीचे अर्धा किलो (४८९ ग्रॅम) सोन्याचे दागिने सापडले. या शिवाय पत्नीच्या नावावर एमआयडीसीत १० हजार चौरस फुटावर चटईची कंपनी असल्याचे आढळून आले. दरम्यान, सुरळकर याला बुधवार, २८ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

विद्युत निरीक्षक सुरळकर हा वर्ग एकचा अधिकारी आहे, त्याला दीड लाख रुपये पगार असून १५ हजार रुपयांची लाच घेताना त्याला अटक केली आहे. सुरळकर याला रंगेहाथ पकडल्यानंतर एसीबीने त्याच्या कार्यालयात झडती घेतली असता त्यांच्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ६८,५०० रुपयांची रोकड सापडली.

त्याच्या पार्वतीनगरातील घरी केलेल्या तपासणीत कपाटातून २ लाख ७ हजार ५५० रुपये रोख, अंदाजे ३० लाख ३९ हजार ८०० रुपये किमतीचे ४८९ ग्रॅम सोन्याचे दागिने सापडले. सुरुळकर याने गुरुकृपा इंडस्ट्रीज या नावाने एमआयडीसीच्या व्ही सेक्टरमध्ये चार वर्षांपूर्वी एक चटईची कंपनी घेतली आहे. सुरुवातीला त्याने स्वत: कंपनी चालवली. एक वर्षांपूर्वी कंपनी दुसन्याला चालवण्यासाठी दिली आहे.

लाचखोर सुरळकर यांच्याकडे एवढी अपसंपदा सापडली असताना त्याने जळगाव जिल्ह्याशिवाय इतरत्रही नातेवाइकांच्या नावावर पुणे, नाशिक, मुंबई येथे मालमत्ता खरेदी केली असण्याचा संशय एसीबीला आहे. त्यादृष्टीने शोध घेतला जात आहे,

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button