जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२२ । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोंबर हा कालावधीमध्ये राज्य सरकारच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहे. त्याअनुषंगाने पाळधी येथे झंवर विद्यालय येथे उद्या दिे. 26 रोजी सकाळी 10:00 वा महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

पाळधी परिसर व चांदसर चोरगाव बांबोरी गट भाजपा शिवसेना यांनी आयोजन केले, तसेच तालुका उपाध्यक्ष किशोर झंवर शहराध्यक्ष संदेश झवर, बापू ठाकरे ,महेंद्र चौधरी प्रकाश ठाकूर आदींनी रक्तदान शिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन केले.